
'ड्रग्ज माफियांना राजकीय आश्रय आहे. मंत्री म्हणून ते अपयश ठरले. दादा भुसे हे भ्रष्ट आहेत. माफियांना पाठिशी घालणारा माणूस आहे. त्यांच्यामुळेच नाशिकचे नुकसान झाले', असेही त्यांनी म्हटले आहे.
नाशिक : नाशिकमध्ये ड्रग्ज माफियांचे जाळे (Drugs Racket) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अगदी लहान मुलेही याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. याच मुद्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले. याबाबत बोलताना त्यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर निशाणा साधला. ‘दादा भुसे ड्रग्ज माफियांना पाठिशी घालणारा माणूस आहे. मंत्री म्हणून ते फेल’ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘नाशिक ड्रग्ज माफियांचा अड्डा बनला आहे. या ड्रग्जमुळे लोकांनी आपापली मालमत्ता विकली. नाशिकमध्ये 7 ते 8 महिन्यांपासून हे ड्रग्ज प्रकरण होत आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाशिक ड्रग्जमुळे चर्चेत येणं दुर्दैवी आहे. या ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्याची गरज आहे.
ड्रग्ज माफियांना राजकीय आश्रय आहे, असे म्हणत त्यांनी पालकमंत्री भुसे यांच्यावर निशाणा साधला. ‘ड्रग्ज माफियांना राजकीय आश्रय आहे. मंत्री म्हणून ते अपयश ठरले. दादा भुसे हे भ्रष्ट आहेत. माफियांना पाठिशी घालणारा माणूस आहे. त्यांच्यामुळेच नाशिकचे नुकसान झाले’, असेही त्यांनी म्हटले आहे.
20 तारखेला शिवसेनेचा विचार मोर्चा
नाशिक ड्रग्ज माफियांचा अड्डा बनला आहे. नाशिकमध्ये घराघरात ड्रग्ज पोहोचत आहे. ड्रग्जच्या अतिसेवनाने तरूणांकडून आत्महत्या केल्या जात आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांना ड्रग्जचा विळखा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 20 तारखेला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विराट मोर्चा काढला जाणार आहे. नाशिकमध्ये घडले ते आपल्या शहरात, गावात घडू नये म्हणून हा मोर्चा सुरु आहे.