खासदार श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर टीकास्त्र, श्रीकांत शिंदे यांनी दर्शवली तुलसी विवाहाला उपस्थिती

कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते.

  कल्याण : आदित्य ठाकरे यांनी या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला. श्रीकांत शिंदे म्हणाले की, ते आता भविष्यच पाहन्याचं काम करतील, भविष्य कोण पाहतो, सोबत पोपट आहेच अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कल्याण ग्रामीण मध्ये खोणी पलावा परिसरात शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटनानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, शिवसेना पदाधिकारी योगेश म्हात्रे, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

  कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी
  येत्या दीड दोन वर्षात शहरातील प्रवास जलदगतिने होणार मेट्रो १२ चा डीपीआर तयार लवकरच निविदा प्रसिद्ध होणार तर विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग असा उड्डाणपूल होणार असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली आहे.

  कल्याण एपीएमसी ते तळोजा पर्यतच्या २० किमी मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार असून लवकरच निविदा प्रसिद्ध होणार आहेत. तसेच विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग असा उड्डाणपूल होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. पुढे बोलताना खासदार शिंदे यांनी कल्याण लोकसभेत मेट्रो, रस्ता रेल्वे आणि त्याचबरोबर वॉटर ट्रान्सपोर्ट याच्या देखील जेट्टीचे काम सुरू आहे त्यामुळे चारही मार्गाने नागरिक प्रवास करू शकतील एवढी उपाययोजना या कल्याण लोकसभा कडून ठेवल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले. खासदार श्रीकांत शिंदे आज शिवसेनेच्या पलावा येथील कल्याण ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटनासाठी आले होते.

  यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मेट्रोची लोकं फार काळापासून वाट पाहत होते. महत्वाकांक्षी मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. मेट्रो १२ चा डीपीआर तयार झाला त्याच्या परवानगी मिळाल्यात, भूसंपादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, हा प्रकल्प कल्याण एपीएमसी मार्केट कल्याण पासून सुरु होतो तो कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण पासून सुरू होऊन तळोजापर्यंत जातो, हा साडेपाच हजार कोटींचा प्रकल्प आहे, हा येत्या सोमवारी याची निविदा जाहीर होईल, २० km चा हा मार्ग आहे. हा मेट्रोमार्ग हा कल्याण लोकसभेच्या लोकांना मिळेल जेणेकरून याच्या माध्यमातून चार शहर जोडले जातील आणि लोकांना कल्याणमधून भिवंडीला, ठाण्याला, नवी मुंबईला जायचं असेल हा सगळीकडे हा मार्ग हा एक मिसिंग लिंक होता हा पूर्ण झालेला आहे.

  कल्याण लोकसभेमध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम सुरू आहेत रस्ता असेल, रेल्वे असेल तिचा तिसरा मार्ग म्हणजे मेट्रो हा उभा केलाय. कल्याण लोकसभेत मेट्रो रस्ता रेल्वे आणि त्याचबरोबर वॉटर ट्रान्सपोर्ट याच्या देखील जेट्टीचे काम सुरू आहे चारही मार्गाने लोकप्रवास करू शकतील एवढे उपाययोजना या कल्याण लोकसभेमध्ये करून ठेवल्याचे सांगितले. पुढे बोलताना शिंदे यांनी कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते.

  हा वळसा येत्या काही दिवसात थांबणार असून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे अडीच किलोमीटरचा सुमारे ४० मिनिटांचा प्रवास वेळ पाच मिनिटांवर येणार आहे. हा प्रकल्प ७०० कोटींचा प्रकल्प आहे या कामाची निविदा लवकरच जाहीर केली जाणार असून या प्रकल्पासाठी ७० टक्के भूसंपादन करण्यात आली असून पुढच्या दीड ते दोन वर्षात हा नवीन मार्ग हा शहरांना कनेक्ट करणारा व लोकांचा वेळ वाचवणारा मार्ग उभा राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

  डोंबिवली जवळील काटई गावात वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने तुलसीविवाह संपन्न

  कल्याण शीळ रोड वरील काटई गावात शिवसेना पदाधिकारि अर्जुन पाटील यांच्या वतीने मोठ्या उत्सवात तुलसीविवाह साजरा करण्यात आला. प्रचंड वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाहाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.