खासदार श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड टीका

आमच्यावर आमच्यावर चांगले संस्कार आमच्या आई-बाबांनी केलेले आहेत. आमची प्रायव्हेट कंपनी नाही. आम्ही घराणेशाही सारखे काम करत नाही आमच्या पक्षात वेगवेगळे नेते आहेत.

    कल्याण : उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या दौऱ्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

    आदित्य ठाकरे यांना वरळी लोकसभेतून उभे केले. त्यावेळेला दोन आमदारांचे तिकीट कट केली आणि आज हे आम्हालाच चोर म्हणत आहेत. आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आलटून-पालटून आमच्याशी कोणीही लढा आम्ही घाबरत नाही असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. राम मंदिराच्या निमित्ताने सगळीकडे आनंद साजरा व्हावा यासाठी शिधा वाटप करण्यात आले. या शिधा वाटप कार्यक्रमानिमित्त ते डोंबिवली येथील नेमाडे गल्लीत आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

    उद्धव ठाकरे यांचे स्वागत मी अगोदरच केले आहे. आज लोकसभा दौरा केल्यानंतर खऱ्या परिस्थितीची जाणीव त्यांना झाली असेल. हे त्यांनी पूर्वीच करणे अपेक्षित होते. पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळी जेव्हा यायचे तेव्हाची गर्दी आणि आताची गर्दी यांच्यातील फरक त्यांना कळला असेल. वाईट या गोष्टीचं वाटत सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा दोनशे ते तीनशे लोक जमू शकत नाही या गोष्टीची त्यांना जाणीव झाली असेलच. गल्लोगल्ली त्याठिकाणी फिरावे लागते.

    तेच शब्द तेच टोमणे लोकांना कंटाळा आला आहे. लोकांना काम हवं आहे ते काम आम्ही करत आहोत. त्यामुळे लोक आमच्या बाजूनेच आहेत. पातळी सोडून भाष्य केलं जात आहे. आम्ही कधीही पातळी सोडून राजकारण केलं नाही. आमच्यावर आमच्यावर चांगले संस्कार आमच्या आई-बाबांनी केलेले आहेत. आमची प्रायव्हेट कंपनी नाही. आम्ही घराणेशाही सारखे काम करत नाही आमच्या पक्षात वेगवेगळे नेते आहेत. विविध नेते वेगवेगळ्या पद भूषवित आहेत. ज्यावेळी कल्याण येथे लढायला कोणी नव्हते त्यावेळी आम्ही होतो.