खासदार श्रीकांत शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांना आव्हान

खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले आहे. डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सव कार्यक्रमादरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

    कल्याण : आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी चर्चा सुरू असताना यावर राजकारण तापले आहे. आता या मुद्द्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले मौन सोडले आहे आणि थेट आदित्य ठाकरेंना कुठून उभे राहायचे आहे असा सवाल उपस्थित करत एका प्रकारे आव्हान दिले आहे.
    डोंबिवलीत आगरी युथ फोरम तर्फे आयोजित आगरी महोत्सव दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शिवसेना शिंदे गट पदाधिकारी सागर जेधे, सागर दुबे उपस्थित होते. या दरम्यान आयोजक गुलाब वझें यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे खूप कौतुक केले. यावेळी  खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये गैर नाही ज्याला पण इकडे उभारायचं त्यांनी इकडे खुशाल उभ राहिला पाहिजे. कॉम्पिटिशन पाहिजे त्या ठिकाणी विरोधक पण चांगला पाहिजे तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल आणि मला वाटतं ज्यांना या ठिकाणी राहायचे उभं त्यांनी पहिले ठरवलं पाहिजे. वरळीतून उभ रहायचे की ठाण्यातून उभ राहायचे का कल्याणमधून उभं राहायचं मला वाटतं त्यांनी ठरवलं पाहिजे रोज असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभे रहायचे तिथून उभारायचे राजकारणात अशा गोष्टी चालत नाही.
    खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले आहे. डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सव कार्यक्रमादरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेवर नाव न घेता टीका केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, आज माननीय मुख्यमंत्री नागपूरला सेशन चालू आहे. पण पहाटे सहा वाजता मुंबईमध्ये येऊन मुंबईची साफसफाई जी गेले अनेक वर्ष झाली नव्हती ती साफसफाई माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करत आहेत. डीप क्लिनिंग त्याला नाव दिलेल आहे. खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता त्याला साफ करायची खूप गरज होती. ती साफ करण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी येऊन करतात आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता साफसफाईमध्ये सामील होईल आणि मुंबई एकदम आणि क्लिंन चकाचक होईल मुंबईमध्ये फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण  होईल. लोकांना जे आवश्यक आहे ते या मुंबईमध्ये उभं राहील.
    मनसे राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधी बद्दल सर्वसामान्यांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये रोष, त्यांना बदल हवा आहे, असं वक्तव्य करत अप्रत्यक्ष रित्या श्रीकांत शिंदे यांना लक्ष केलं होतं. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही. तर आम्ही दिवसरात्र लोकांची कामे करतो. कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केलीत कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. मात्र विरोधकांची तितकी हिम्मत नाही कारण त्यांच्याकडे छातीठोक पणे सांगण्यासारखी कामेच नाहीत. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही दुसरे काम नाही म्हणूनच मी त्यांच्या टिकाकडे लक्ष देत नाही आणि माझी टी सवय नाही असा टोला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अप्रत्यक्ष रित्या मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह विरोधकांना लगावला आहे. विरोधकांच्या नाराजीवर ते बोलत होते.मंचावर उभे राहिल्यानंतर केलेल्या आणि होणारया कामाचा पाढा आपण वाचू शकतो कारण मी  कोणाच्याही टीकेकडे लक्ष न देता कामे करत असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच कल्याण लोकसभा क्षेत्रात इतके मोठे पायाभूत सुविधाचे कामे उभे राहू शकल्याचे त्यांनी सांगितले.