खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो बॅनरवर लावणार नाही – संतापलेले भाजपचे पदाधिकारी

सुपर सीएमकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना करणार असा निर्णय मलंग गड भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

    प्रत्येक कामात अडथळा, आमच्या निधीचा शिवसेनेचे पदाधिकारी श्रेय लाटतात. अनेक दिवसांपासून हा त्रास आहे. परंतु आता सहनशीलतेच्या पलिकडे गेले आहे. यापुढे आम्ही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्मात श्रीकांत शिंदे यांचा फोटो वापरणार नाही. सुपर सीएमकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना करणार असा निर्णय मलंग गड भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    पक्षाचे पदाधिकारी समीर भंडारी यांच्यासह अभिमन्यू म्हात्रे, श्याम पाटील, जगदीश म्हात्रे आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळीबार गेला. या घटनेमुळे एकच खळबळ माजली. आमदार गायकवाड हे पोलीस कोठडीत आहेत. आमदारांनी केलेल्या गोळीबाराचे आम्ही समर्थन करीत नाहीत. मात्र त्यांना गोळीबार करण्याची वेळ का आली या मागची कारणे नेमकी काय आहेत. हे समजून घेतले पाहिजे. भंडारी यांनी सांगितले की, खासदार शिंदे यांच्याकडूून भाजप आमदारांना त्रास होता. भाजप कार्यकत्यांना त्रास दिला जात होता.

    आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत समितीकडून मंजूर झालेला विकास निधी हा भाजपच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाला होता. हा निधी नागरी विकास कामे करण्याकरीता मिळाला होता. मात्र खासदार या मंजूर कामांचे श्रेय घेत होते. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेल्या विकास कामांच्या ठिकाणी खासदारांकडून फलक लावले जात होते. त्या विकास कामांचे भूमीपूजनही खासदारांचे पदाधिकारी करीत होते. खासदारांच्या या त्रासाला कंटाळून आम्ही निर्णय घेतला आहे की, यापूढे कोणत्याही कार्यक्रमाच्या बबॅनरवर खासदारांचा फाेटा वापरायचा नाही. त्यांच्याकडून भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला जाणाऱ्या त्रासाची तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे करण्यात येणार आहे.