खासदार सुनील तटकरे, सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा येथे भेट

समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे, सुनेत्रावहिनी पवार यांनी आज ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी शुक्रवारी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

    यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. याप्रसंगी रा. कॉ. जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंडे, तालुका अध्यक्ष आरती मोकल तसेच अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अमित नाईक, रा. कॉ. मुरूड तालुका अध्यक्ष फैरोज घल्टे, जिल्हा चिटणीस चारूहास मगर, जिल्हा सचिव आशिष भट, जिल्हा संघटक ॠषीकांत भगत, रा.कॉ. अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, रा.कॉ. अलिबाग तालुका युवक अध्यक्ष मनोज शिर्के, रोहाचे मयुर खैरे, रा.कॉ. मुरूड तालुका मनोज भगत, स्मिता खेडेकर, रमेश नागांवकर, अजीत कासार, माजी जि.प.सदस्य सुबोध महाडिक, माजी सरपंच संतोष कांबळी, दिनेश बापलेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

    सकाळी अकरा वाजणेचे सुमारास सुनेत्रा पवार यांचे खाजगी विमानाने साळाव जेएसडब्लू कंपनी येथील हॅलिपॅडवर आगमन झाले. यावेळी रा.कॉ. विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत केले. त्यानंतर तेथून त्यांनी रेवदंडा येथे जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांचे निवासस्थानी प्रस्थान केेले.

    रेवदंडा निवासस्थानी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि कुटूंबियांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचे समवेत खासदार सुनिल तटकरे, राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुष्पगूच्छ प्रदान करून शुभाशिर्वाद घेतले, तेव्हा निरूपणकार सचिनदादार धर्माधिकारी, राहूलदादा धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.