vinayak raut

सिंधुदुर्गातील (Sindhudurg) मालवण तळगाव या गावात विनायक राऊत यांचे घर आहे. ते दरवर्षी ११ दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करत असतात. यावर्षी स्वतः हार्मोनियम वाजवत भजन गाण्यात तल्लीन (MP Vinayak Raut Singing Bhajan) झालेले विनायक राऊत बघायला मिळत आहेत.

    सिंधुदुर्ग: सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2022) उत्साह दिसून येत आहे. सगळेजण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करत आहेत. शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनीही गणेशोत्सवामध्ये भजनाचा आनंद घेतला.

    सिंधुदुर्गातील मालवण तळगाव या गावात विनायक राऊत यांचे घर आहे. ते दरवर्षी ११ दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करत असतात. यावर्षी स्वतः हार्मोनियम वाजवत भजन गाण्यात तल्लीन झालेले विनायक राऊत बघायला मिळत आहेत. राऊत यांच्या बाप्पाचरणी दररोज जिल्ह्यातील १५ ते १८ भजन होतात. राऊत स्वतः या भजनांचा आस्वाद घेत असतात. तर काही वेळा स्वत: हार्मोनियम वाजवत भजन गात असतात. विनायक राऊत यांना भजनाची आवड असल्याने कोकणात गणेशोत्सव काळात केल्या जाणाऱ्या भजनांचा ते आनंद तुटत असतात.