MPDA action! The notorious criminal was lodged in the Central Jail

निखील वाडीवेविरुध्द एमपीडीएचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांनी एसीपी (Kotwali Police ACP) व डीसीपी (DCP) मार्फत पोलीस आयुक्तांकडे (Commissioner of Police) पाठविला होता. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने प्रस्तावाची पूर्तता केली.

    अमरावती : विविध गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार (Notorious criminals) निखील मोहन वाडीवे (Nikhil Mohan Wadive) (३२, रा. समाधाननगर) याच्यावर शहर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई (MPDA action ) करून, त्याला मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द (Located in the Central Jail) केले आहे. कुख्यात गुन्हेगार निखील वाडीवे हा २०२० पासून गुन्हेगारी सक्रीय आहे.

    त्याच्याविरुद्ध इच्छापुर्वक दुखापत करणे, शिवीगाळ करणे, लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करणे, त्यांच्यावर हल्ला करणे, मारण्याची धमकी देणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, फसवणूक करणे, बदलाग्रहण करण्यासाठी भीती निर्माण करून जबर दुखापत करणे, जबरी चोरी अशा प्रकारचे एकुण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    त्यामुळे निखील वाडीवेविरुध्द एमपीडीएचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांनी एसीपी (Kotwali Police ACP) व डीसीपी (DCP) मार्फत पोलीस आयुक्तांकडे (Commissioner of Police) पाठविला होता. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने प्रस्तावाची पूर्तता केली. सदर प्रस्तावावर कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Police Commissioner Dr. Aarti Singh) यांनी २३ जून रोजी निखील वाडीवेविरुध्द स्थानपध्दतेचे आदेश पारीत केले.