mpsc recruitment

. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC News) तब्बल 8169 पदांसाठी जाहिरात काढली आहे.

    मुंबई: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC News) तब्बल 8169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठीचे पात्रतेचे निकष, अर्ज करण्याची पद्धत, पगार इत्यादी सगळी माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकमध्येदेखील सविस्तर माहिती मिळू शकेल.


    मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. तसेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 ही 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर गृह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशी 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार 600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांची एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल.

    वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असून पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल. वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा भरल्या जातील. मंत्रालयातील प्रसाशकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रीत विविध कार्यालयासाठी या जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पगार 19900 ते 63 हजार 200 रुपये या दरम्यान असतील.