MSEDCL's illegal power cut and recovered! Electricity is cut off without legal notice

वीज नियामक मंडळाच्या नियमानुसार ग्राहकाला वीज खंडित (Power outage) करायची असल्यास पूर्वसूचना द्यावी लागते. ग्राहकाने थकीत बिला पैकी ५० टक्के रक्कम भरल्यास त्याचा वीज पुरवठा खंडित करता येत नाही. मात्र, येथे उपअभियंता (Deputy Engineer) व सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) वीज नियामक मंडळाचे तसेच महावितरण कंपनीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वसूली करीत आहे.

    नांदगाव खंडेश्वर : महावितरण (MSEDCL) कंपनीचे तालुक्यात गरीब सर्वसामान्यांच्या घरी जाऊन कोणतीही पूर्वसूचना न देता वसुली सुरू केली आहे. वीज नियामक मंडळाच्या नियमानुसार ग्राहकाला वीज खंडित (Power outage) करायची असल्यास पूर्वसूचना द्यावी लागते. ग्राहकाने थकीत बिला पैकी ५० टक्के रक्कम भरल्यास त्याचा वीज पुरवठा खंडित करता येत नाही. मात्र, येथे उपअभियंता (Deputy Engineer) व सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) वीज नियामक मंडळाचे तसेच महावितरण कंपनीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वसूली करीत आहे. सामान्य गरीब लोकांकडून पेरणीच्या तोंडावर जबरदस्तीने संपूर्ण वीजबिल भरून घेण्याची सक्ती करीत आहे व अनेकांची विज खंडित (Power outage)  करून त्यांना अंधारात ठेवत आहे.

    मोठ्या वसुलीकडे दुर्लक्ष गरीबांवर सक्ती

    गत तीन वर्षात कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने कामधंदे ठप्प झाले. त्यामुळे वीज बिले मोठ्या प्रमाणावर थकली आहेत. त्यातच सरकारने वीज बिलात सवलत देण्याच्या चर्चा रंगवल्यानंतर लोकांना वीज बिल माफ होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने कोणतीही सवलत दिली नाही. उलट सक्तीने वीज बिलाची वसुली (Electricity bill waived) सुरु केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष भडकला आहे.

    मोठ्या थकीतदारावर अधिकारी मेहरबान

    नांदगावसह तालुक्यातील मोठ्या वीज बिल थकीतदार ग्राहकांच्या वसुलीकडे अधिकारी कानाडोळा करत आहे. अधिकारी व बड्या थकबाकीदारांची मिलीभगत आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य गरीब ग्राहकांना पडला आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.