laxman kewte

एसटीचे पहिले वाहक म्हणून 1 जून 1948 रोजी रुजू झालेले लक्ष्मण केवटे दीर्घकाळ एसटीची सेवा बजावून 1984 साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते अहमदनगर या मूळ गावी राहत होते. त्यांना पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

  मुंबई: अहमदनगर – पुणे या मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिल्यांदा एसटीची फेरी सुरु झाली. या पहिल्या एसटीचे वाहक (St Conductor) लक्ष्मण केवटे (Laxman Kewte Passed Away) (वय 99) यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आह. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘अमृतमहोत्सवी एसटीचा कृतिशील साक्षीदार हरपला’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

  एसटीच्या इतिहासात त्यांच्या कार्याची दखल कायम घेतली जाईल – मुख्यमंत्री
  ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. 1 जुन 1948 साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे. या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणारे लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल”,असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

  अहमदनरगमध्ये वास्तव्य
  एसटीचे पहिले वाहक म्हणून 1 जून 1948 रोजी रुजू झालेले लक्ष्मण केवटे दीर्घकाळ एसटीची सेवा बजावून 1984 साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते अहमदनगर या मूळ गावी राहत होते. त्यांना पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

  त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच आमची प्रेरणा – शेखर चन्ने
  “एसटीच्या जन्माची कहाणी ज्यांच्या तोंडून आपण ऐकली ती शक्ती आज अनंतात विलीन झाली. त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच आमची प्रेरणा आहे. ”असं केवटे यांना एसटीच्या वतीने श्रध्दांजली वाहताना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे.

  एसटी महामंडळाचे अहमदनगर, विभाग नियंत्रक यांच्यामार्फत एसटी महामंडळाने केवटे यांना आदरांजली वाहीली आहे.