mumbai to panaji shivshahi bus

एसटी महामंडळाच्या मुंबई विभागामार्फत मुंबई सेंट्रल ते पणजी (Mumbai To Panaji Shivshahi Bus) अशी वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

    मुंबई: दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळनिमित्त सुट्टीला गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या मुंबई विभागामार्फत मुंबई सेंट्रल ते पणजी (Mumbai To Panaji Shivshahi Bus) अशी वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस दररोज संध्याकाळी ४.३० वाजता मुंबई सेंट्रल येथून निघून पनवेल, महाड, चिपळूण, कणकवली, सावंतवाडी मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पणजी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात देखील पणजीहून संध्याकाळी ४.३० वाजता निघून त्याच मार्गाने मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल.

    या बसचे मुंबई ते पणजी तिकीट १२४५ रुपये इतके आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच प्रवासी msrtc mobile reservation app वरुन देखील आपले आसन आरक्षित करू शकतात. ही बस सेवा १ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

    थोडक्यात पण महत्त्वाचे

    • भाडे : १,२४५ रुपये
    • थांबे : पनवेल, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी
    • बस प्रकार : वातानुकूलित शिवशाही
    • कालावधी – २३ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३
    •  मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता सुटून पणजीमध्ये सकाळी ७ वाजता पोहोचणार