मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी दहशतीखाली : योगेश साठे

मुळा पाटबंधारे विभाग येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुळा पाटबंधारे विभाग, राहुरी, नेवासा आणि अमरापुर येथे शाखा अभियंता म्हणून काम पाहणारे हेम्बडे यांच्या कार्यकाळतील झालेल्या कामाची माहिती मागितली होती.

    अहमदनगर : येथील मुळा पाटबंधारे विभाग येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुळा पाटबंधारे विभाग, राहुरी, नेवासा आणि अमरापुर येथे शाखा अभियंता म्हणून काम पाहणारे हेम्बडे यांच्या कार्यकाळतील झालेल्या कामाची माहिती मागितली होती.

    हेंबाडे यांच्या काळात सदर कामे ही बोगस निकृष्ट दर्जाची बनावट असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून, त्यात कोट्यवधींचा झालेला भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून सदर माहिती देण्यास हेतूपुरस्पर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप साठे यांनी निवेदनात केला आहे. अपीलार्थी यांना विनामूल्य सात दिवसाच्या आत माहिती देण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता कू.सायली पाटील यांनी देण्यात आले होते. मात्र, ही माहिती मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

    संबंधित जनमाहिती अधिकारी पी.बी.अकोलकर उप कार्यकारी अभियंता हे वेळ काढूपणा करीत आहेत. त्यासंबंधी मुख्य अभियंता नाशिक सिंचन भवन यांना देखील याबाबत तक्रार योगेश साठे यांनी केली आहे.या तक्रारीत असे म्हटले आहे की, हेंबाडे उपविभागीय अधिकारी यांचे राजकीय संबंध यामुळे पाणलोट क्षेत्रातील सामान्य शेतकरी व मजूर संस्था या यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास धजत नाही.

    हेंबाडे यांनी यांच्या काळात कॅनॉल दुरुस्ती,दरवाजे बदलणे, लायनींग, कॅनॉल मधील झाडेझुडपे काढणे यासारख्या छोट्या मोठ्या कामात शासकीय निधीचा वापर करून देखील बोगस संस्थांच्या नावाने बनावट बिल तयार करण्यात केली आहेत. या कामात शासनाची फसवणूक करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे साठे यांनी म्हंटले आहे. याप्रकरणी शासनस्तरावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास पुराव्यांसह जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.