मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी

महामार्गावरील सातिवली ब्रिजवर सदर कार आल्यावर वाहन चालकाचा ताबा सुटला.

    रवींद्र माने- वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज पहाटे झालेल्या कार अपघातात तीन जण ठार झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पहाटे सहा वाजता मुंबईवरून कारने पाच जण गुजरातच्या दिशेने चालले होते. महामार्गावरील सातिवली ब्रिजवर सदर कार आल्यावर वाहन चालकाचा ताबा सुटला.

    त्यामुळे कार दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर आदळली. या जोरदार धडकेत कारमधील तिघेजण जागीच ठार झाले तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यापैकी कोणाचीही ओळख पटलेली नाही अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.