मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, एयर क्वालिटी इंडेक्स कितीवर माहितेय का? आरोग्यतज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा…

दिल्ली पेक्षाही मुंबईत हवेतील गुणवत्ता घसरली आहे. हवेतील प्रदूषण मुंबईत आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. एयर क्वालिटी इंडेक्स 300 अंकाच्या वर गेला आहे.

    मुंबई : मुंबईकरांच्या (Mumbai) आरोग्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या हिवाळा सुरु आहे, त्यामुळं राज्यातील काही भाग सोडता सर्वंत्र थंडी, गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत, दरम्यान, वाढत्या प्रदूषणामुळं (Pollution) मुंबईतील वातावरण बिघडले असून, मुंबईत हवेतील गुणवत्ता (air quality) खालावली आहे, त्यामुळं त्याच्या परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मुंबईत किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील बुधवारी व गुरुवारीची हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली होती.

    दरम्यान, दिल्ली पेक्षाही मुंबईत हवेतील गुणवत्ता घसरली आहे. हवेतील प्रदूषण मुंबईत आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. एयर क्वालिटी इंडेक्स 300 अंकाच्या वर गेला आहे. सकाळच्या सत्रात देखील मुंबईच्या हवामानात मोठा बदल झालेला दिसून आला असून धुक्याची चादर मुंबईनगरीवर पडलेली दिसून आली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार असे हवामान आठवडाभर राहण्याची शक्यता असल्याने मुंबईत आठवडाभर असाच गारवा राहणार आहे.

    सफर संस्थेच्या माध्यमातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 300 अंकांच्या वर मुंबईचा एयर क्वालिटी इंडेक्स गेला असून ही पातळी अधिक गडद होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे मुंबईतील हवामानात देखील मोठा बदल झाला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात या थंडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवत होता. परंतु मुंबई सारख्या शहरात देखील थंडीचा जोर अधिकच वाढला असून हवेतील प्रदूषण देखील वाढले आहे, मुंबईसह उपनगरात धुकं दिसून येत असून सातत्याने हवेतील प्रदूषण वाढत आहे. याचा परिणाम आरोग्यवर होणार असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.