मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब, हवेतील गुणवत्ता घसरली संपू्र्ण जानेवारी महिना ठरला प्रदूषित; कारण माहितेय आहे का?

आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील हवा घसरल्यानं मुंबईची हवा (Mumbai's Air Quality) दिल्लीपेक्षा देखील खराब असल्याचं समोर आलं आहे.

  मुंबई : मुंबईकरांच्या (Mumbai) आरोग्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या हिवाळा सुरु आहे, त्यामुळं राज्यातील काही भाग सोडता सर्वंत्र थंडी, गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत, दरम्यान, वाढत्या प्रदूषणामुळं (Pollution) मुंबईतील वातावरण बिघडले असून, मुंबईत हवेतील गुणवत्ता (air quality) खालावली आहे, त्यामुळं त्याच्या परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मुंबईत किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील हवा घसरल्यानं मुंबईची हवा (Mumbai’s Air Quality) दिल्लीपेक्षा देखील खराब असल्याचं समोर आलं आहे.

  संपूर्ण जानेवारी महिना प्रदूषित…

  दरम्यान, दिल्ली पेक्षाही मुंबईत हवेतील गुणवत्ता घसरली आहे. हवेतील प्रदूषण मुंबईत आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. विशेष म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण जानेवारी महिना प्रदूषित आढळल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. यासाठी मुंबईतील वाढते हवा प्रदूषण कारणीभूत ठरत आहे.

  हवा गुणवत्ता निर्देशांक

  मुंबई (पवई केंद्र)

  • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
  • समाधानकारक-(Satisfactory) : 02 दिवस
  • साधारण प्रदूषण(Moderate) :13 दिवस
  • जास्त प्रदूषण ( Poor) : 16 दिवस
  • धोकादायक प्रदूषण आढळले नाही

  ठाणे (पिंपलेश्वर मंदिर केंद्र)

  • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
  • समाधानकारक (Satisfactory) : 00 दिवस
  • साधारण प्रदूषण (Moderate) : 14 दिवस
  • जास्त प्रदूषण ( Poor) : 14 दिवस
  • धोकादायक प्रदूषण (Very Poor) : 03 दिवस

  कल्याण (खडकपाडा केंद्र)

  • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
  • समाधानकारक-(Satisfactory) : 00 दिवस
  • साधारण प्रदूषण (Moderate) : 22 दिवस
  • जास्त प्रदूषण ( Poor) : 09 दिवस
  • धोकादायक प्रदूषण आढळले नाही

  नवी मुंबई (महापे केंद्र)

  • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
  • समाधानकारक-(Satisfactory) : 01 दिवस
  • साधारण प्रदूषण (Moderate) :18 दिवस
  • जास्त प्रदूषण ( Poor) : 12 दिवस
  • धोकादायक प्रदूषण आढळले नाही