Mumbai bank scam

बोगस मजूर प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा पोलिस चौकशीला हजर राहिले. तेथे त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चौकशीनंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर निशाणा साधला.राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत असून मला अटक करण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला(Mumbai Bank bogus labor case Govt cracks down on arrests; Praveen Darekar's sensational allegation after three hours of interrogation).

    मुंबई : बोगस मजूर प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा पोलिस चौकशीला हजर राहिले. तेथे त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चौकशीनंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर निशाणा साधला.राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत असून मला अटक करण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला(Mumbai Bank bogus labor case Govt cracks down on arrests; Praveen Darekar’s sensational allegation after three hours of interrogation).

    मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकर यांची 4 एप्रिल रोजी रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशनमध्ये चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार दरेकर सोमवारी चौकशीसाठी हजर झाले होते.

    पोलिस दबावाखाली काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी पोलिस चौकशीला संपूर्ण सहकार्य करत असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.

    दरम्यान, पोलिसांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली. पण सरकारलाच मला छळायचे असेल म्हणून पुन्हा बोलावण्यात आले असेल असे दरेकर चौकशीला जाण्यापूर्वी म्हणाले. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले असून आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे , भाई जगताप आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारादेखील दरेकर यांनी दिला. तशा नोटीसा निघाल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबै बँकेचा नफा 15 कोटी आणि दोन हजार कोटी रुपयांचा आरोप करता, तुमच्या पब्लिसिटीसाठी एखादी इन्स्टिट्यूशन बदनाम करता, हे योग्य नाही, असेदेखील ते म्हणाले.