मुंबई शहर भागात शुक्रवारी, शनिवारी पाणीपुरवठा बंद; परेल, एल्फिन्स्टन विभागांमधील काही परिसरात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    मुंबई : महानगर पालिकेतर्फे ई विभागातील (BMC E Ward) पाणीपुरवठा (Water Supply) व्यवस्थित करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै जंक्शन म्हातारपाखाडी तसेच डॉकयार्ड मार्गालगत असलेली १४५० मिलीमीटर व्यासाची जुनी जलवाहिनी (Old Pipe Line) काढून टाकण्याचे काम शुक्रवारी २१ जानेवारी सकाळी १० वाजल्यापासून शनिवारी २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दक्षिण मुंबई या विभागांमधील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद (Water Supply Closed) राहणार आहे. तर परेल, एल्फिन्स्टन विभागांमधील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

    संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यासाठी देखील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शहर भगातील नागरिकांना पालिकेने केले आहे.