मुंबई-गोवा हायवे, रिफायनरीसह अनेक महत्त्वाचे मुद्दे मार्गी लागणार? एकनाथ शिंदे यांच्या कोकण दौऱ्याला का महत्त्व… जाणून घ्या ‘हे महत्त्वाचे’ मुद्दे

विविध विकासकामांसाठी ७५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तर काही विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं आजचा मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा अनेक अंगानी महत्त्वाचा आहे.

  रत्नागिरी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांचा दिवसभर भरगच्च असा कार्यक्रम आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेणार आहेत. तसेच विविध विकासकामांसाठी ७५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तर काही विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं आजचा मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा अनेक अंगानी महत्त्वाचा आहे. ( Chief Minister Eknath Shinde is on a visit to Konkan)

  शिंदे गट-ठाकरे गट एकाच मंचावर?

  दरम्यान, शिंदे यांचे ऐतिहासिक बंडानंतर या दौऱ्याच्या निमित्ताने शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक आमदार हे राजन साळवी व स्थानिक खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटाचे आहेत, त्यामुळं राजशिष्टाचार म्हणून त्यांना आमंत्रित करणं किंवा निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळं आज रत्नागिरीत शिंदे गट व ठाकर गट एकाच मंचावर येणार का? याची चर्चा रंगत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते त्या कार्यक्रमाला जाणार नाहीयेत, अशी माहिती समोर येते

  बारसू राफियानरीवर तोडगा निघणार?

  मागील काही महिन्यांपासून रत्नागिरीत होणाऱ्या बारसू राफियानरीचा प्रकल्प वादात सापडला आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे, तर सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवत, स्थानिकांना रोजगार व महसूल निर्माण होईल असं म्हटलं आहे. त्यामुळं बारसू प्रकल्पाचा आढावा किंवा तिथंही सीएम जाण्याची शक्यता आहे

  मुंबई-गोवा महामार्ग ३० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार?

  दरम्यान, मुंबई-गोवा हायवेबाबात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, मागील १५ वर्षापासून हा महामार्ग रेंगाळला आहे. त्यामुळं थेट गोव्यात जाण्यासाठी प्रवाशांना खूप त्रास होतोय. तसेच मागील १५ वर्षात तीन सरकारं आली पण महामार्गांचा मार्ग मोकळा झाला नाही, मुंबई-गोवा महामार्ग ३० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं या महामार्गाबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार का? हे पाहवे लागेल.