केला होता कुटाणा, करत होते धिंगाणा, राडा व्हायचाच राहिला आणि अखेर चंद्रकांत खैरेंचे ‘ते’ शब्दच खरे ठरले

मेळाव्याला परवानगी मिळत नसल्याने ठाकरे गटातील शिवसैनिक अधिक आक्रमकतेने आपली भूमिका मांडत होते. त्यापैकीच एक माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी वक्तव्य करत काल चांगलीच वातावरण निर्मिती केली होती.

    मुंबई : दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) हा शिवतीर्थावर (Shivtirtha) घ्यायचा असा चंगच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बांधला होता त्यामुळेच शिवसैनिकांनी (Shivsainiks) दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर जमण्याचा आदेशही गेला होता पण दसरा मेळाव्याला अद्याप परवानगीच न मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्लान बी रेडीही ठेवला होताच (Plan B is Ready). आज मुंबई उच्च न्यायालयाने (High Court Mumbai) उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांचा विजय झाला असून आता त्यांना मेळावा शिवाजी पार्कवरच (Shivaji Park, Dadar, Mumbai) घेता येणार आहे.

    मेळाव्याला परवानगी मिळत नसल्याने ठाकरे गटातील शिवसैनिक अधिक आक्रमकतेने आपली भूमिका मांडत होते. त्यापैकीच एक माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी वक्तव्य करत काल चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. काल वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना सगळंच तळ्यात-मळ्यात असताना प्रतिनिधींनी परवानगीबाबत प्रश्न विचारले असताना, ‘देणार नाही म्हणजे काय? झक मारत त्यांना परवानगी द्यावीच लागेल’ असं विधान केलं होतं. काल त्यांनी वर्तविलेलं हे भाकीत आज खरं ठरलं आहे.

    आज मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. आता उद्धव ठाकरे गटप्रणित शिवसेनेलाच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह संचारला असून नवीन टॅगलाइनही तयार झाल्या आहेत. नव्यानेच तयार झालेली ‘ वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या!’ ही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.