विवाहित असताना दुसरे लग्न करून शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पहिले लग्न झाले असताना दुसऱ्या लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार होय. असे कृत्य हा बलात्काराचा गुन्हा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीनंतर दाखल झालेला गुन्हा रद्द करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे.

    मुंबई : पहिले लग्न झाले असताना दुसऱ्या लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार होय. असे कृत्य हा बलात्काराचा गुन्हा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीनंतर दाखल झालेला गुन्हा रद्द करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे.

    पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर एकटी असलेल्या महिलेच्या असाहायतेचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवली होती. त्यात त्याने पीडित महिलेला सांगितलं की, पत्नीशी जुळत नाही, म्हणून तो तिच्यापासून विभक्त होणार आहे. त्यानंतर पहिले लग्न अस्तित्वात असतानाही 18 जून 2014 रोजी त्याने पीडित महिलेशी विवाह केला. आरोपी आणि पीडित महिला दोन वर्षे एकत्र राहिले होते. सततच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने 27 सप्टेंबर 2019 रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.

    दरम्यान, हाच गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आरोपीच्या वतीने हायकोर्टात दाखल केली होती. पहिला विवाह असताना दुसरा विवाह करण्यास परवानगी नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यानुसार, विवाहित असताना दुसरे लग्न करून शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.