भाजप नेते किरीट सोमय्या यांना दणका; ‘त्या’ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांना हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना न्यायालयाच्या आदेशांची, एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते?, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

सक्तवसुली संचालनालयाच्या (Enforcement Directorate) छापेमारीनंतर अडचणीत आलेले माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. असे असले तरी 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे न्यायालयाने सोमय्या यांना दणका देत याप्रकरणी आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर

हसम मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून आज कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

घरी व संस्थांवर ईडीची छापेमारी

कोल्हापूर जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना तसेच 11 जानेवारी रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यापूर्वी अनेकदा छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.