lasalgaon market committee

लासलगांव बाजार समितीची (Lasalgaon Market Committee) मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या निर्णयाविरोधात विद्यमान बाजार समितीच्या सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आणि प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळवली होती.

    मुंबई: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगांव बाजार समितीची निवडणूक (Lasalgaon Market Committee Election) नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai HighCourt) दिले. तसेच खंडपीठाने यापूर्वी प्रशासक नियुक्तीला दिलेली स्थगितीही कायम ठेवली आहे.

    लासलगांव बाजार समितीची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या निर्णयाविरोधात विद्यमान बाजार समितीच्या सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आणि प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळवली होती. न्यायालयाच्या या स्थगितीला आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. भूषण देशमुख आणि अ‍ॅड. वेदांन्त बेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

    त्या याचिकेवर न्या. एस.व्ही गंगापूरवाला आणि न्या.आर.एन.लड्डा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. बाजार समितीमध्ये अनियमितता असल्याचा दावा करून स्थगिती उठवून प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अथवा तातडीने निवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती अ‍ॅड. भुषण देशमुख यांनी केली होती. त्यांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने दिलेली स्थगिती उठविण्यास नकार दिला. मात्र, ठरलेल्या निवडणूकीच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात यावा, असा आदेश देऊन याचिका निकाली काढली.