Nagpur court grants divorce, consolation for married woman

कोल्हापूरातील (Kolhapur) सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल येथे १ एप्रिल २०२२ रोजी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फुटबॉल खेळताना एका मुलीला फूटबॉल लागला. त्यावर संताप व्यक्त करत शाळेच्या अध्यक्षांनी त्या विद्यार्थ्याला अर्वाच्च शब्दात सुनावले. अपमानानंतर त्या मुलाने (Student Suicide Case) आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.

  मुंबई: अपशब्द, अश्लाघ्य भाषा वापरून अल्पवयीन मुलाला आत्महत्येस (Student Suicide Case)  प्रवृत्त करणाऱ्या आंतरराष्ट्रीय शाळेतील अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन (Bail)अर्ज नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. विद्यार्थ्यांना फटकारताना शिक्षकांनी त्यांच्या नाजूक मनाचाही तेवढाच विचार करावा, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने अर्ज फेटाळून लावला.

  कोल्हापूरातील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल येथे १ एप्रिल २०२२ रोजी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फुटबॉल खेळताना एका मुलीला फूटबॉल लागला. त्यावर संताप व्यक्त करत शाळेच्या अध्यक्षांनी त्या विद्यार्थ्याला अर्वाच्च शब्दात सुनावले. तू एक नायालक आहे, तू कधीच सुधारणार नाहीस, झोपडपट्टीछाप आहेस, तुझ्यासारख्या प्रवृत्तीच्या मुलांना जगण्याचा अधिकार नाही. जगावर तुम्ही भार आहात. या जगात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तू पृथ्वीवर भार आहेस, अशा अश्लाघ्य भाषेचा त्यांनी वापर केला. त्यावर न थांबता अध्यक्षांनी मुलाच्या आजोबांना फोन करून शाळेत बोलावून घेतले. त्यांच्यासमोरही त्याला सुनावले आणि नातवाला घेऊन जा, शाळेतून काढून टाका ,असे सांगितले. त्या अपमानानंतर त्या मुलाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी शाळेतील अध्यक्षांविरोधात शिरोळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  कोल्हापूर पोलिसांनी त्यानुसार अध्यक्षांवर भादंवि आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) च्या संबंधित तरतुदीच्या कलम ३०५ (आत्महत्येला प्रवृत्त करणे), ५०४ (हेतूपूर्वक अपमान), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ३४ (सामान्य हेतू) अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यामुळे शाळेतील अध्यक्षांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर नुकतीच न्या. विनय जोशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

  आत्महत्येस अप्रत्यक्ष कृतीही कारणीभूत

  प्रत्येक प्रकरण हे त्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थितीवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीने आत्महत्येस प्रवृत्त केले आहे की नाही, हे केवळ प्रकरणातील तथ्यांवरून समजते. कारण, आत्महत्येमागे अप्रत्यक्ष कृती असू शकते. या प्रकरणात असे दिसते की, याचिकाकर्त्यांच्या (शाळेचे अध्यक्ष) विरोधात विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांचे म्हणणे आक्षेपार्ह आहे, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

  विद्यार्थ्याच्या मनात खोल निराशेची छाप

  याचिकाकर्त्याने मुलाच्या आजोबांच्या उपस्थितीत अर्वाच्च शब्दात खडसावले होते. त्यामुळे प्रथमदर्शनी असे दिसून येते की, त्या खडसावण्याचा विद्यार्थ्याच्या मनावर खोल निराशेची छाप पाडली. या घटनेनंतरच काही तासात मुलाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकांवरून फटकारू शकतात परंतु, मुलांच्या नाजूक मनाला धक्का लागेल किंवा त्यांचे कोवळे मन विचलित होणार नाही, याचेही भान राखावे असेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आणि याचिकाकर्त्यांच्या कृत्यामुळे एका तरुण विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हे विसरूनही चालणार नाही, या खटल्याचा तपास सुरू आहे. त्याबाबत चौकशीसाठी याचिकाकर्त्यांची कोठडीत आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण देण्यास नकार देत अर्ज फेटाळून लावला.