मलिक-देशमुखांना राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत सुद्धा मतदान करता येणार नाही, मलिक-देशमुखांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका मलिक व देशमुख (Malik and Deshmukh) यांनी दाखल केली होती. यावर कालच्या सुनावणीनंतर आज न्यायालयाने दोघांना मतदान करण्यास परवानगीला नकार दिला आहे. दरम्यान, अनिल देशमुख व नवाब मलिक यांचा अर्ज  मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) फेटाळला असून, मतदान (Voting) करता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Leaders Anil deshmukh and Nawab Malik) हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या तुंरुगात आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha election) या दोन्ही नेत्यांना मतदान (Voting) करण्यासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता 20 जून रोजी विधान परिषद मतदान होत (20 June MLC Election) आहे. या निवडणुकीसाठी मतदान (Voting) करता यावे यासाठी या दोघांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. (The petition hearing) यावेळी न्यायालयाने निर्णय राखूत ठेवत यावर आज दुपारी 2.30 वाजता निर्णय दिला आहे.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मलिक व देशमुख या दोन नेत्यांना न्यायालयाने झटका दिला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या समोरील अडचणी सुद्धा वाढल्या आहेत. दोन्ही नेते तुरुंगात असल्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. तसेच मविआला दोन मतं गमवावी लागली होती. या दोन नेत्यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी दिली नव्हती, किमात आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका मलिक व देशमुख (Malik and Deshmukh) यांनी दाखल केली होती. यावर कालच्या सुनावणीनंतर आज न्यायालयाने दोघांना मतदान करण्यास परवानगीला नकार दिला आहे. दरम्यान, अनिल देशमुख व नवाब मलिक यांचा अर्ज  मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) फेटाळला असून, मतदान (Voting) करता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.

    20 जून रोजी विधान परिषद परिषद मतदान होत (20 June MLC Election) आहे. त्यामुळं आपणाला मतदान करता यावं यासाठी या दोघांनी याचिका दाखल केली होती. मात्र आज निर्णय देताना, अनिल देशमुख व नवाब मलिक यांचा अर्ज  मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून, मतदान करता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.