MegaBlock

माटुंगा स्टेशन  ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे.

    मुंबई – आज १५ मे रोजी रविवारी मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ही वेळ पाहूनच पुढील नियोजन करावं. माटुंगा स्टेशन ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक कालावधीत रेल्वेरुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. या कामांमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या उशीराने धावणार आहेत.

    मध्य रेल्वे

    • स्थानक – माटुंगा ते मुलुंड
    • मार्ग – अप आणि डाऊन धीमा
    • वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५

    परिणाम – ब्लॉक कालावधीत माटुंगा ते मुलुंडदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. देखभाल, दुरुस्तीच्या कामांमुळे रविवारी लोकलफेऱ्या १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    हार्बर रेल्वे

    • स्थानक – सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी
    • मार्ग – अप आणि डाऊन
    • वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

    परिणाम – ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

    पश्चिम रेल्वे

    • स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
    • मार्ग – अप आणि डाऊन जलद
    • वेळ – सकाळी १०.३५ ते दुपारी ३. ३५

    परिणाम – ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे.