Megablock

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

  मुंबईत उद्या तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. त्यामुळे उद्या वीकेंडला मुंबईत लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी उद्या हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbor Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

  उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डाच्या दिवा मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  कोणत्या कोणत्या मार्गवार असणार मेगाब्लॅाक

  मध्य रेल्वे

  माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरानं उशिरानं लोकल धावतील.

  ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटं उशिरानं लोकल धावतील.

  हार्बर रेल्वे

  पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)

  पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  पश्चिम रेल्वे

  पश्चिम रेल्वे मार्गावर वसई यार्ड ते दिवा अप डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रात्री 12.15 ते मध्य रात्री 3.15 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वसई यार्डातील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे.