मुंबई मेट्रो, मोनोचा महिन्याला कोट्यावधीचा फटका; प्रवाशी संख्येत घट तसेच ‘या’ कारणांमुळं…

महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) चालविल्या जाणाऱ्या मेट्रो व मोनो रेल मार्गिका संयुक्तपणे मासिक ६७ कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मुंबई : मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोला (Metro) प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळं रेल्वे व बसवरील ताण कमी झाला. तसेच प्रवाशांचा प्रवास कमी वेळेत जलदगतीने झाला. परंतु मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेले मोनो (Mumbai Mono) मात्र सध्या तोट्यात सुरु आहे. मुंबईत वडाळा ते संत गाडगे महाराज चौक येथे मोनो रेल सुरु केली आहे, मात्र हिकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असल्यामुळं मोनो रेल कोट्यावधीच्या तोट्यात आहे. (Mumbai Metro, Mono hit crores a month; Due to decline in passenger numbers as well as ‘these’ reasons)

    मेट्रो व मोनोमुळं महिन्याला ६७ कोटीचे नुकसान

    दरम्यान, मार्चअखेरीस मेट्रोचा वार्षिक तोटा २८१ कोटी रुपये व मोनो रेलचा वार्षिक तोटा २४२ कोटी रुपये होता. त्यात चालू आर्थिक वर्षात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) चालविल्या जाणाऱ्या मेट्रो व मोनो रेल मार्गिका संयुक्तपणे मासिक ६७ कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोनो रेलला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३१ मार्च, २०२३ अखेरीस तब्बल २४२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या संपूर्ण वर्षात प्रकल्पाला फक्त १३.४१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर यानंतर आता मार्गिकेसाठी ५८० कोटी रुपयांच्या नवीन गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव आहे.

    मोनोला ५०० कोटींचा फटका…

    एमएमआरडीएकडून अंधेरी पश्चिम ते गुंदवलीमार्गे दहिसर ही मेट्रो २ अ व मेट्रो ७ ही संयुक्त मार्गिका एप्रिल, २०२२ आणि जानेवारी, २०२३मध्ये दोन टप्प्यांत सुरू झाली. मोनो रेलसाठी जवळपास २४६० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर कार्यान्वित झालेल्या दोन मेट्रोसाठी जवळपास १२ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, या तिन्ही मार्गिका आज भीषण तोट्यात आहेत. दुसरीकडे मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिकांचा ३१ मार्च, २०२३चा (वर्ष २०२२-२३) तोटा २८१ कोटी रुपये होता.