विकासासाठी मुंबई महापालिकेत समान विचारांची सत्ता हवी, मुंबईकरांना पंतप्रधानांचं आवाहन, भ्रष्टाचारात, बँकांमध्ये मनपाचे पैसे नकोत, उद्धव ठाकरेंना टोला

विकसित भारताच्या निर्माणात शहरांची भूमिका महत्त्वाची आहे. यात महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील अनेक शहरं भारताच्या विकासाला गती देतील. त्यामुळं मुंबईचा विकास करणं हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. डबल इंजिन सरकारमुळं मेट्रोचा विस्तार झालाय. थोडा वेळ कामाची गती कमी झाली होती, मात्र आता शिंदे- फडणवीसांमुळे पुन्हा कामानं गती घेतली आहे.

  मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले आहे. ४० हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण आणि शिलान्यास इथं झालाय. मेट्रो, सीएसएमटी आधुनिकीकरण, रस्त्यांच्या सुधारणा, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आपला दवाखन्याची सुरुवात. हे सगळं मुंबईला अधिक चांगलं करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारत मोठी स्वप्न बघण्याचं आणि पूर्ण करण्याचं आव्हान पेलतो आहे. आत्तापर्यंत गरिबी, जगासमोर पैसे मागणे हेच घडत होतं. आता जगातील मोठ-मोठ्या देशांना भारताच्या स्वप्नांवर विश्वास आहे, असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं.

  भारताबाबत जगभरात सकारात्मकता

  दरम्यान, भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन जगाचा बदलतो आहे. भारताबाबत जगभरात सकारात्मक आहे. कारण भारत त्याच्या सामर्थ्याचा सदुपयोग करतो आहे. आज सगळ्यांना वाटतंय की भारत गतीनं विकास आणि समृद्धीसाठी आवश्यक आहे ते करतोय. भारत अभूतपूर्व आत्मविश्वासानं भरलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनं सरकार काम करतंय. डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे. गेल्या आठ वर्षांत एप्रोच बदलला आहे. आता भविष्याचा वेध घेऊन सामाजिक, आधुनिक पायाभूत सोयीसुविधांवर खर्च करण्यात येतोय. सध्याची गरज आणि भविष्यातील बाबींकडे बघून हा विकास करण्यात येतोय. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था बेहाल आहेत. मात्र अजूनही भारत ८० कोटी जनतेला मुफ्त रेशन देतोय. अशा स्थितीत पायाभूत सोयीसुविधांवर खर्च करण्यात येतोय. विकसीत भारताचं हे प्रतिबिंब आहे. असं मोदींनी म्हटलं.

  विकास हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता

  विकसित भारताच्या निर्माणात शहरांची भूमिका महत्त्वाची आहे. यात महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील अनेक शहरं भारताच्या विकासाला गती देतील. त्यामुळं मुंबईचा विकास करणं हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. डबल इंजिन सरकारमुळं मेट्रोचा विस्तार झालाय. थोडा वेळ कामाची गती कमी झाली होती, मात्र आता शिंदे- फडणवीसांमुळे पुन्हा कामानं गती घेतली आहे. रेल्वेच्या आधुनिकीकरणावरही भर देण्यात येतोय, असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं.

  मुंबईचा कायापालट होणार

  सामान्य माणसालाही श्रीमंतांना मिळणाऱ्या सुविधांचा सलाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतोय. त्यामुळेच रेल्वे स्टेशन्सही एयरपोर्टसारखी पॉश करण्यात येतायेत. म्हणूनच सीएसेमटीचाही कायापालट करण्यात येतोय. सामान्य प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळआव्यात. प्रवास चांगला व्हावा. ही धारणा आहे. स्टेशनवर मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीची सोय असेल. हीच मल्टी मॉडेल कनेक्टिव्हीटी देशातील प्रत्येक शहरात विकसीत करण्यात येणार आहे. आधुनिक मुंबई लोकल, मेट्रो, वंदे भारत, बुलेट ट्रेन यामुळे येत्या काही वर्षांत मुंबईचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. गरीब, मजूर, उद्योगपती या सगळअयांसाठी इथं राहणारं सुखकर होईल, असे मोदी म्हणाले.

  मुंबईचा विकास जलदगतीने होतोय

  आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनही इथं येणं सुखकर होईल. इंदू मिल स्मारक, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास असे प्रकल्प मुंबईला गती येतील. सगळं काही ट्रॅकवर येतंय. यासाठी शिंदे आणि फडणवीसांचं अभिनंदन. रस्त्यांची काम सुरु झालेत ते ही डबल इंजिन सरकारचं यश आहे. शहरं परिवर्तीत करण्यासाठी प्रयत्न सुरुयेत. प्रदूषण, स्वच्छता याकडं लक्ष देण्यात येतंय. इंधनाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कचऱ्याच्या समस्या ही नव्या तंत्रज्ञानानं बदलवण्याची योजना आहे. नद्यांमध्ये घाणेरडं पाणी असू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतायेत.

  विकासात राजकारण करु नये…

  मुंबईसारख्या शहरात प्रकल्प गती मिळत नाही, जोपर्यंत महापालिका त्याला जोड देत नाही. मुंबईच्या विकासात महापालिकेचं स्थान महत्त्वाचं आहे. मुंबईसाठी बजेटची कमी नाही. मात्र पैसा योग्य जाई जायला हवा. भ्रष्टाचार होऊ नये, पैसे पडून राहू नयेत, विकासाला विरोधाची भूमिका उपयोगी नाही. भाजपाचं सरकार असो की एनडीएचं ते विकासात राजकारण आणत नाहीत. विकासाच्या कार्याला सरकारनं गतीरोध केलेला नाही. मुंबईत मा६ हे सातत्यानं पाहायाला मिळालं. स्वनिधी योजना हे त्याचं उदाहरण आहे. फेरीवाले हे शहराच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व आहे. स्वनिधी योजनेत त्यांच्यासाठी योजना आखण्यात आली. त्यात महाराष्ट्राला ५ लाख जणांना फायदा होणार होता. हे काम पहिलं व्हायला हवं होतं. मात्र डबल इंजिन सरकार नसल्यानं ते झालं नाही. प्रत्येक कामात अडचणी निर्माण करण्यात आल्या. असं मोदी म्हणाले.

  शिंदे-फडणवीस जोडी स्वप्नांना साकार करेल

  यापुढं असं घडू नये यासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेत समान विचार करणारे अ्सतील, हे पाहायला हवं. स्वनिधी योजना ही स्वाभिमानची मुळी आहे. सगळ्यांचे प्रयत्न असतील तर अशक्य काही नसतं. डिजिटल इंडिया हे त्याचं उदाहरण आहे. फेरीवाल्यांना आवाहन करतो की आपल्यासोबत चला. तुम्ही १० पाऊले चलालात तर आपण १२ पाऊले चालू. फेरीवाल्यांना वाचवण्यासाठी स्वनिधी योजना आहे. शिंदे-फडणवीस ही जोडी तुमच्या स्वप्नांना साकार करेल, हा मला विश्वास आहे. असं शेवटी मोदींना आपल्या भाषणात सांगितले.