मुंबई NCB ची मोठी कारवाई, जळगाव जिल्ह्यात पकडला तब्बल १५०० किलो गांजा

एनसीबीनं कारवाई दरम्यान ट्रक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 49 पोत्यात जवळपास एक टन गांजा जप्त करण्यात आला. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतलं. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथुन गांजा आणला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचं एक पथक पाळत ठेऊन होतं. मात्र हा गांजा नेमका कुठं जाणार होता. याचा तपास सुरू आहे.

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई पथकाने महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून 1500 किलो गांजा पकडला आहे. हा गांजा ही आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत आणण्यात येणार होता. पोलिसांनी आतापर्यंत 2 जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

    मुंबई एनसीबीने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे सकाळी 1500 किलो गांजा जप्त केला. ट्रकमधून गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची टीप एनसीबीला मिळाली होती. एनसीबीने ट्रक थांबवून त्याची झडती घेतली असता सुमारे 1500 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सध्या याप्रकरणी एनसीबीकडून पुढील कारवाई सुरू आहे.