मोठी बातमी! भाडेकरू ठेवताना सतर्कता न बाळगल्यास होऊ शकतो अनर्थ; मुंबई पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

पाकिस्तानी दहशतवादी संघटना मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. हे लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ६ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्यामध्ये घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यास सांगण्यात आले आहे.

  • पोलिसांची भाडेकरूंवर करडी नजर
  • माहिती पोलिसांना देणे बंधनकारक
  • पोलिसांच्या घरमालकांना सूचना

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी (Mumbai Economic Capital Of India) मुंबई पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे (targeted by pakistani terrorists). गुप्त सुरक्षा यंत्रणांकडून याबाबत वारंवार संकेत मिळत आहेत.

शहराची सुरक्षा पाहता मुंबई पोलीस आयुक्तांनी विशेष दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार घरमालकांना आपल्या भाडेकरूंची पूर्ण माहिती पोलीस ठाण्यांना देण्यास सांगण्यात आले आहे. विशेषत: परदेशी नागरिकांची माहिती देणे गरजेचे आहे. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानी दहशतवादी संघटना मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. हे लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ६ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्यामध्ये घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यास सांगण्यात आले आहे. जर घरमालकाने आपल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली नाही, तर त्याच्यावर कलम १४४ अन्वये फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते.

लोकांनाही सतर्कतेचा इशारा

सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या परिसरातील संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांनाही विशेष सतर्क राहण्यास सांगितले आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यास सांगण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता कलम ११४ अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली आहे. लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यांना देण्यास सांगण्यात आले आहे. परदेशी नागरिकांना घरात ठेवण्यापूर्वी पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. जर कोणी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

– संजय लटकर, पोलीस उपायुक्त