मुंबईत भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामन्यापूर्वी पोलिसांना मिळाली धमकी! सुरक्षा व्यवस्थेत वाढ

बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना मुंबईत होणार आहे. यापूर्वी पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. या पार्श्वभुमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

  क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा (world cup semi final) पहिला सामना आज (१५ नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (wankhede stadium) भारत आणि न्यूझीलंड (India new Zealand) यांच्यात होणार आहे. या सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र त्याआधीच सामन्याला लक्ष्य केले जाईल, अशी धमकी (Mumbai Police Gets Threat ) देण्यात आली आहे.

  नेमका प्रकार काय?

  मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज उपांत्य पुर्व फेरीचा पहिला सामना होणार आहे. या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांंकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशातच मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून ट्विटरच्या माध्यमातून धमकीचा मेसेज आला आहे, ज्यामध्ये मॅचदरम्यान काही मोठी घटना घडवून  असं असल्याचं सांगण्यात आलं. या पार्श्वभुमीवर आता मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात करडी नजर ठेवली आहे.

  धमकी देणाऱ्या व्यक्तीने सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोसह टॅग केले. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा संदेश देणारा फोटोही पोस्ट करण्यात आला होता.

  काय म्हणाले मुंबई पोलीस?

  मुंबई पोलिसांनी सांगितले की, “आज वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान एक घटना घडली जाईल असा धमकीचा संदेश एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला. स्टेडियमच्या परिसरात आणि आजूबाजूच्या परिसरात कडक पाळत ठेवली जात आहे. त्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केले होते आणि फोटोमध्ये बंदूक, ग्रेनेड आणि गोळ्या दाखवल्या होत्या.