
यावर्षी ५ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण वेगवेगळ्या प्रदेशात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यासाठी विशेष नियम लागू (Special Rules Applicable) केले आहेत.
मुंबई : होळीचा सण (Holi Festival) धुलिवंदन (Dhulivandan) मुंबईसह राज्यभरात (Celebrate In Maharashtra Including Mumbai) मोठ्या उत्साहात साजरे केले जाते पण सणाच्या नावाखाली अनेक घटनाही घडतात, त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कंबर कसली आहे. यावर्षी ५ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण वेगवेगळ्या प्रदेशात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यासाठी विशेष नियम लागू (Special Rules Applicable) केले आहेत. नागरिकांनी या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही (Strict Action Warning) पोलिसांनी दिला आहे.
होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी दरम्यान नागरिकांनी या नियमांचे पालन करावे.
१) अश्लील शब्द किंवा घोषणा वापरू नका किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाऊ नका.
२) जेश्चर किंवा मिमिक्री वापरू नका तसेच, कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा, शालिनता किंवा नैतिकता दुखावणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर वस्तू किंवा गोष्टी प्रदर्शित किंवा प्रसारित करु नका.
३) पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारू नका किंवा फेकू नका.
४) रंगीत किंवा साधे पाणी, कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे फेकून मारू नका किंवा फेकू नका अन्यथा असं करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
हे नियम मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करेल किंवा या आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत शिक्षा होईल. हे आदेश व नियम ५ मार्च २०२३ पासून ११ मार्च २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात आले आहेत, असे परिपत्रक मुंबई पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्ध केले आहे.