शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, दिघेंना मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स

शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं आहे. (Mumbai police notice to kedar dighe) बलात्कार प्रकरणातील पीडित व्यक्तीला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपामध्ये केदार यांची चौकशी होणार आहे.

    मुंबई : शिवसेनेतील ३९ आमदारांनी (Shivsena MLA) केलेले बंड. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) आलं आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोंडी घडत शेवटी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) अस्तित्वात आले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणूनन देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेतील खासदार, नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठींबा देण्याचा धडाका सुरुच आहे. यामुळं शिवसेना पक्षाला गळती लागली असून, मोठे भगदाड पडले आहे. मात्र ठाण्यातून आनंद दिघेंचे (Anand dighe) पुतणे यांनी एकनाथ शिंदेबरोबर न जाता शिवसेनेला पाठींबा दिला आहे. शिवसेनेत राहणे पसंत केले. केदार दिघे (Kedar dighe) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यामुळं केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे (udhav Thackeary) यांनी ठाणे जिल्हाप्रमुख (Thane distric chief) पदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र आता केदार दिघे हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. त्यामुळं शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या अडचणीत भर पडली आहे.

    दरम्यान, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं आहे. (Mumbai police notice to kedar dighe) बलात्कार प्रकरणातील पीडित व्यक्तीला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपामध्ये केदार यांची चौकशी होणार आहे. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळं नंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. केदार दिघेंना कधीही मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलावू शकतात. यामुळं केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या अडचणीत भर पडली आहे.