urfi javed and chitra wagh

चित्रा वाघ यांच्या तक्रारी नंतरही उर्फी काही थांबण्याची चित्र दिसत नाही आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेत त्यांनी आता सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे.

  मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात सुरु असलेले वाद काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये. ट्विटवरुन सुरू झालेला वाद आता सरळ कायद्याच्या चौकटीत येण्याची शक्यता आहे.  चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आज उर्फी जावेदला सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. आज तिला अंबोली पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

  चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच ट्विटर वॅार

  गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर ट्विटर वॅार सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिला ट्विट करत सुनावलं.  इतकच नव्हे तर या प्रकरणी मुंबई पोलीस आणि राज्य महिला आयोगालाही लक्ष देण्याची मागणी केली. सार्वजनिक ठिकाणि असं नंगटपणा करणं खपवून घेणार नाही, असं त्यांनी म्हण्टलं होतं. तर, उर्फीनेही चित्रा वाघ यांना प्रत्तुतर दिलं माझ्यापेक्षा आणखी महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रीत करा असा टोला तिने चित्रा वाघ यांना दिला होता.  दरम्यान,  चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार केली होती.

  मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस

  चित्रा वाघ यांच्या तक्रारी नंतरही उर्फी काही थांबण्याची चित्र दिसत नाही आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेत त्यांनी आता सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. पोलिसांनी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी केली आहे.  सहाय्यक पोलिस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

  उर्फीने रुपाली चाकणकर यांची भेट घेतली

  उर्फी जावेदने शुक्रवारी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची देखील भेट घेतली आहे. काल उर्फीने महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणी उर्फीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतच्या भेटीत तक्रार दाखल केली आहे.