तब्बल सात वर्षानंतर हरवलेल्या मुलीला शोधण्यात मुंबई पोलिसांना यश

मुंबईच्या अंधेरी परिसरातून सात वर्षांची चिमुकली पुजा हरवली होती. हॅरी डिसोझा नावाच्या व्यक्तीने तिचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. अपहरकर्त्यांनी पूजाला आइस्क्रीमचे लालुच दाखवून तिचे अपहरण केलं होतं

    मुंबई : एखादं मुलं हरवल्यानंतर काही वर्षांनंतर सुखरुप सापडणं हे असं काहीसं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल. पण ते प्रत्यक्षात घडलयं ते ही मुंबईमध्ये. 9 वर्षापुर्वी हरवलेली मुलगी आता सापडल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला असून गुरुवारी तिच्या आई- वडिलांकडे तिला सुपूर्द करण्यात आलं आहे. (missing girl found after 9 years) शाळेजवळून पूजाचे अपहरण करणाऱ्यासही डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.

    याबाबतची माहिती अशी की, अंधेरी परिसरातून सात वर्षांची मुलगी साधारण नऊ वर्षानंतर मुंबईतून बेपत्ता झाली होती. या मुलीली शोधण्यासाठी तिच्या कुटुंबियांसह पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. मात्र ती काही सापडली नाही.
    अखेर तिला शोधण्यात मुंबई पोलिसांना यश आलं असून तिला तिच्या आई- वडिलांकडे तिला सुपूर्द करण्यात आलं आहे. पुजा गौड असं त्या मुलीचं नाव आहे.

    कशी झाली बेपत्ता

    तेव्हा आरोपी हॅरी डिसोझा आणि त्याच्या पत्नीला मुलबाळ नव्हते आणि म्हणून त्यांनी पूजाला मुलगी म्हणून ठेवून घेतले. तिचे नाव बदलून अॅनी ठेवले. तीन वर्षांनंतर डिसोझा दाम्पत्याला मुल झाल्यानंतर पूजाला मारहाण करायला सुरुवात केली. घरातली सगळी कामं ते पूजाकडून करुन घ्यायचे. तिला दुसरीकडेही काम करायला भाग पाडत होते. व मारहाण करुन तिच्याकडून तिचे कमाईचे पैसे काढून घेत होते. दरम्यानच्या काळातही पोलिसांकडून पुजाचा शोध सुरू होता.

    अपहरण करणाऱ्यांना अटक

    विलेपार्ले येथील झोपडपट्टीमध्ये एक मुलगी राहत असून, तिचे आई-वडील तिला नीट वागणूक देत नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद कुरडे यांना मिळाली होती. काही तरी संशयास्पद वाटत असल्याने कुरडे यांनी कॉन्स्टेबल संदीप डांगे याना नेहरूनगर झोपडपट्टीमध्ये पाठविले. त्यांनी या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. आपल्या पोलिस ठाण्यातील हरवलेल्या मुलांच्या नोंदी; तसेच मिसिंग ब्युरो अॅपवरही शोधले असता ही मुलगी पूजा गौडप्रमाणे दिसत असल्याचे वाटले. पोलिसांनी खात्री करण्यासाठी तिच्या आई-वडिलांना बोलावले. ही पूजाच असल्याचे त्यांनी सांगताच पोलिसांनी हॅरी डिसोझा याला ताब्यात घेतले.