
सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळविण्यात आली आहेत. यामुळे लोणावळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली असून खंडाळा, लोणावळा ते एक्सप्रेस वेच्या वलवण येथील एक्झिट पॉईटपर्यत वाहनांच्या रांगा रांगा पहायला मिळत आहेत.
रायगड : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली एक केमिकलच्या टँकर उलटला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे. तर सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. केमिकल रस्त्यावर उतारामुळे लांबवर पसरल्याने मुंबई बाजुकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
बोरघाटमध्ये पहाटे 5:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळविण्यात आली आहेत. यामुळे लोणावळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली असून खंडाळा, लोणावळा ते एक्सप्रेस वेच्या वलवण येथील एक्झिट पॉईटपर्यत वाहनांच्या रांगा रांगा पहायला मिळत आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यानंतर आता ती लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. पुण्याकडील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.