संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून (Mumbai-Pune Expressway) जाणाऱ्या वाहनचालकांना आता आणखी आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलसाठी (Toll Prices Hiked) ज्यादा पैसे द्यावे लागणार आहेत.

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून (Mumbai-Pune Expressway) जाणाऱ्या वाहनचालकांना आता आणखी आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलसाठी (Toll Prices Hiked) ज्यादा पैसे द्यावे लागणार आहेत. येत्या एक एप्रिलपासून याचा फटका सर्वच वाहनचालकांना बसणार आहे.

मुंबई आणि पुणे येथील हजारो नागरिक दररोज या मार्गाचा वापर करत असतात. त्यांना या टोलवाढीचा मोठा फटका बसणार आहे. एक्स्प्रेस वेवरील टोल दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढतो. मात्र, हे दर तीन वर्षांनी एकाचवेळी लागू होतात. यापूर्वी 1 एप्रिल 2020 रोजी टोलमध्ये वाढ करण्यात आली होती. दर तीन वर्षांनी टोलवाढीबाबत अधिसूचना जारी केली जाते. 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मध्ये टोलच्या दरात वाढ होत आहे.

टोलची ही दरवाढ जाहीर झाल्यानंतर येत्या एक एप्रिलपासून वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सध्या चारचाकी वाहनांसाठी 270 रूपये टोल द्यावा लागतो. पण या टोलवाढीनंतर यात वाढ होऊन 320 रूपये द्यावे लागणार आहेत. तसेच टेम्पोसाठी 420 रुपये द्यावे लागत होते. एक एप्रिलपासून 495 रुपये द्यावे लागणार आहेत.