मुंबईत थर रचताना दहीहंडी उत्सवात ३५ गोविंदा जखमी, केईएम आणि राजावाडी रुग्णालयात गोविंदांवर उपचार सुरु

मध्य मुंबईतील परळ येथील नागरी संचालित केईएम रुग्णालयात प्रत्येकी दोन आणि घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात काही गोविंदांना दाखल करण्यात आले आहे

    मुंबई दहीहंडी उत्सव : आज दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी जल्लोषात साजरा केला जात आहे. दहीहंडीच्या उत्सवासाठी गोविंदा १-२ महिन्याआधीच थर रचण्याचा सराव करत असतात. भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव पारंपारिक उत्साहात साजरा केला जातो. उत्सवाचा एक भाग म्हणून, गोविंदा किंवा दहीहंडीच्या उत्साहामध्ये सहभागी झालेले सर्व भाविक हवेमध्ये लटकलेली दही हंडी तोडण्यासाठी एकावर एक उभे राहून पिरॅमिड तयार करतात. सकाळी सुरू झालेला हा उत्सव रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

    दहीहंडी फोडण्यात यशस्वी होणाऱ्या गोविंदांना रोख बक्षिसे दिली जातात. शहरांमध्ये विविध ठिकाणी या दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्या जातात. बऱ्याच वेळा थर रचताना गोविंदा खाली पडण्याची आणि स्वतःला इजा होण्याची शक्यता असते कधीकधी ते आपल्याला जास्त सुद्धा मार लागू शकतो.

    नुकतीच एक बातमी आली आहे की, मुंबईतील दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत किमान ३५ गोविंदांना दुखापत झाली आहे. त्यापैकी चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे – मध्य मुंबईतील परळ येथील नागरी संचालित केईएम रुग्णालयात प्रत्येकी दोन आणि घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात काही गोविंदांना दाखल करण्यात आले आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या सक्रिय उपायांचा एक भाग म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी नागरी संचालित रुग्णालयांमध्ये १२५ खाटा तयार ठेवल्या आहेत, असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले.