मुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक

शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) यंदाच्या वर्षी बीकेसी मैदानावर (BKC Ground) होत आहे. दसरा मेळाव्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते हे बीकेसी मैदानावर येणार आहेत. दसरा मेळाव्याला येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांच्या वाहनतळाची सोय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

    मुंबई: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी (Darara Melava) येणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) जागा देण्यात आली आहे. ही जागा देण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. युवासेनेने (Yuvasena) राज्यपालांकडे तक्रार केली असून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आणि छात्र भारती संघटनेनेही त्याला विरोध केला आहे.

    मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात येणारी चित्रनगरी मैदान, नॅनो सायन्स जवळील मोकळी जागा, कुलगुरू निवासस्थानासमोरील मोकळी जागा ही दसरा मेळाव्याच्या वाहनतळसाठी देण्यात येणार आहे. हे समजताच  विद्यार्थी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.

    शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदाच्या वर्षी बीकेसी मैदानावर होत आहे. दसरा मेळाव्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते हे बीकेसी मैदानावर येणार आहेत. दसरा मेळाव्याला येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांच्या वाहनतळाची सोय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

    मुंबई विद्यापीठाची जागा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाच्या पार्किंगसाठी वापरली जात असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP Youth Congress) सह इतर विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. युवासेना ठाकरे गटाने यासंबंधी राज्यपालांकडे तक्रार केली आहे. या पार्किंगसाठी झाडे तोडल्याचाही आरोप संघटनांनी केला आहे.