मुंबई उर्जा मार्ग मुंबईतील तरुणांची कौशल्य विकासामधील क्षमता वाढवणार…

मुंबई ऊर्जा मार्ग या मुंबईतील आगामी महत्त्वपूर्ण पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्‍पाने मुंबईतील तरूणांसाठी कौशल्‍य विकास व प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्‍यासाठी सिमेन्‍स ऐक्‍य एज्‍युकेशन अॅण्‍ड वेल्‍फेअर ट्रस्‍टसोबत सहयोग केल्‍याची घोषणा केली. 

    मुंबई : मुंबई ऊर्जा मार्ग या मुंबईतील आगामी महत्त्वपूर्ण पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्‍पाने मुंबईतील तरूणांसाठी कौशल्‍य विकास व प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्‍यासाठी सिमेन्‍स ऐक्‍य एज्‍युकेशन अॅण्‍ड वेल्‍फेअर ट्रस्‍टसोबत सहयोग केल्‍याची घोषणा केली.

    सरकारच्‍या ‘कौशल भारत कुशल भारत’ दृष्टीकोनाशी संलग्‍न असलेल्‍या या उपक्रमाचा मुंबई महानगर प्रदेशामधील २०० हून अधिक तरूणांना टप्‍प्‍याटप्‍प्‍यांनी प्रशिक्षित करण्‍याचा मनसुबा असेल. त्‍यांना नोकरीसाठी सुसज्‍ज करण्‍याच्‍या मनसुब्‍यासह हा प्रशिक्षण उपक्रम तरूणांना उद्योगाशी संबंधित कौशल्‍यांचे प्रशिक्षण घेण्‍याची संधी देईल, ज्‍यामुळे त्‍यांना स्थिर उदरनिर्वाह संधी मिळवण्‍यामध्‍ये साह्य होऊ शकते.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन आज नेरळ येथे श्री निनाद पितळे, प्रकल्प संचालक- मुंबई ऊर्जा मार्ग यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राजेश शर्मा- सचिव आणि कोषाध्यक्ष, भाजप कल्याण बदलापूर प्रदेश; श्री अविनाश भोपी, नगरसेवक- कुळगाव बदलापूर नगर परिषद; श्री अशोक राणे, अध्यक्ष- सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट; श्री गिरीश अष्टेकर, सचिव- सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते, श्री हरेश धुळे. उपस्थित होते.

    या प्रशि‍क्षण उपक्रमाच्‍या पहिल्‍या बॅचमध्ये २० विद्यार्थ्‍यांचा समावेश असेल, ज्‍यांची प्रवेश परीक्षेच्‍या माध्‍यमातून निवड करण्‍यात येईल. निवडण्‍यात आलेल्‍या विद्यार्थ्‍यांना तीन आठवडे काटेकोरपणे प्रशिक्षण देण्‍यात येईल, ज्‍यामध्‍ये इलेक्ट्रिकल प्रशिक्षणाचे मुलभूत ज्ञान संपादित करण्‍यासाठी व्‍यावहारिक व सैद्धांतिक मॉड्यूल्‍सचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये आणि कंत्राटदारांसोबत काम सुरू करण्याकरिता आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षण अध्यापनाची रचना करण्‍यात आली आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, तसेच करिअर समुपदेशन आणि प्लेसमेंट सहाय्य देखील मिळेल.

    पहिल्‍या बॅचमध्‍ये निवडण्‍यात आलेला विद्यार्थी हृतिक अरुण विरले म्‍हणाला, ”माझ्यासारख्‍या तरूणांसाठी हा सर्वोत्तम उपक्रम आहे. मला इलेक्ट्रिकल प्रशिक्षणाचे प्राथमिक ज्ञान होते, पण सिद्धांत व व्‍यावहारिकतेचे उत्तम संयोजन असलेल्‍या या प्रशिक्षण उपक्रमासह ज्ञान परिपूर्ण होईल आणि मी रोजगारासाठी सुसज्‍ज बनेन.”

    आणखी एक विद्यार्थी यश कैलास भोईर म्‍हणाला, ”मी हा रोजगार केंद्रित प्रशिक्षण उपक्रम सुरू केल्याबद्दल आयोजक, स्थानिक प्रशासनाचे आभार मानतो. प्रशिक्षण आम्हाला कुशल बनण्यास आणि आमच्यासाठी संधी निर्माण करण्‍यास सहाह्य करेल.”

    या उपक्रमाबाबत बोलताना मुंबई ऊर्जा मार्गचे प्रकल्प संचालक निनाद पितळे म्हणाले: ”मुंबई ऊर्जा मार्गमध्‍ये आम्‍ही कार्यरत असलेल्‍या भागामधील समुदायांवर सकारात्‍मक सामाजिक परिणाम घडवून आणण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. बेरोजगार व वंचित तरूणांना कौशल्‍य विकास प्रशिक्षण देण्‍यामागे आमचा त्‍यांच्‍यासाठी संधी निर्माण करण्‍याचा मूळ उद्देश आहे, ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमता आत्‍मसात करू शकतात. आम्‍ही पहिली बॅच सुरू केली आहे आणि भविष्‍यात व्‍यापक पोहोच व परिणामाच्‍या खात्रीसाठी अधिक बॅचेस् सुरू करण्‍यात येतील.”

    मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्‍पाबाबत:

    मुंबई ऊर्जा मार्ग, हा ऊर्जा मंत्रालयाने आखलेला आंतर राज्य पारेषण यंत्रणा प्रकल्प आहे. त्याची रचना मुंबई महानगर प्रदेशासासाठी विश्वासार्ह, परवडणाऱ्या दरातील आणि हरित ऊर्जेच्या निर्मितीच्या उद्दिष्टाने केली गेली आहे. कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ऊर्जा मार्गची प्रदेशाकरिता आंतर-राज्‍य पारेषण यंत्रणा (आयएसटीएस) फीडच्‍या माध्‍यमातून जवळपास २००० मेगावॅटपेक्षा अधिक ऊर्जा वाहून नेण्‍याची क्षमता असेल. हा प्रकल्‍प वाढत्‍या ऊर्जा मागणीची पूर्तता करण्‍यासाठी आणि ऊर्जा आवश्यकतांच्‍या संदर्भात ते भविष्‍यासाठी सुसज्‍ज करण्‍यासाठी विद्यमान पारेषण यंत्रणा अधिक प्रबळ देखील करेल.