वाडिया रुग्णालयात मोठी आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील प्रसिद्ध वाडिया रुग्णालयाच्या (Wadia Hospital fire) पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Fire Bridge six van) अग्निशमन दलाच्या जवानाकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

    मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून आगीच्या (Fire) घटनेत वाढ होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध वाडिया रुग्णालयाच्या (Wadia Hospital fire) पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Fire Bridge six van) अग्निशमन दलाच्या जवानाकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर आहे. त्याच भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग नेमकी का लागली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आगीच्या घटनेने परिसर प्रचंड हादरला आहे. आगीची लोळ व धुराचे लोट सर्वंत्र परिसरात पसरले आहेत.