water
संग्रहित फोटो

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम 31 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. या कारणामुळे मुंबईत महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 31 मार्च 2023 पासून पुढील 30 दिवस 15 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

मुंबई: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. जलबोगदा दुरुस्ती कामामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात येत्या 31 मार्च पासून पुढील 30 दिवस 15 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम 31 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. या कारणामुळे मुंबईत महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 31 मार्च 2023 पासून पुढील 30 दिवस 15 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याला देखील ही कपात लागू राहील.