मुंबईकरांनो उद्या वेळा पत्रक बघूनच बाहेर पडा; रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ‘या स्थानकांत’ मेगा ब्लॉक

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

  मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्या रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबईकर फिरायला बाहेर पडतात, पण जर तुम्ही उद्या बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर थांबा. कारण उद्या रविवारी मध्य रेल्वे व हार्बर रेल्वे ( Central and Harbor Railway) मार्गावर मेगा ब्लॉक (Sunday Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळं रेल्वेचे वेळा पत्रक बघूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही बाहेर अडकण्याची शक्यता आहे. उद्या मध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbaikars, go out after seeing the papers tomorrow; Mega Block in this Station on Central and Harbor Railway Lines on Sunday)

  मध्य रेल्वे किती वाजता मेगा ब्लॉक?
  दरम्यान, मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

  हार्बर रेल्वे मेगा ब्लॉक?

  कुर्ला – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि
  वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणा ऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.