मंत्री धनंजय मुंडेंना मानसिक तणावामुळे ब्रेन स्ट्रोक, करुणा शर्माच्या बहिणीने केलेल्या छळामुळं मुंडेंना ब्रेन स्ट्रोक

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यासंदर्भात दाखल झालेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा झाला आहे. धनजंय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून ते डिप्रेशनमध्ये गेले होते. तसेच करुणा शर्माच्या बहिणीने (Karuna Sharma sister) केलेल्या छळाच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना मानसिक तणाव आला होता. त्यामुळं त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मुंबई : राज्यात एकिकडे विधानपरिषद निवडणुकीची (MLC Election 2022) धामधूम असताना, एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासंदर्भात दाखल झालेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा झाला आहे. धनजंय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून ते डिप्रेशनमध्ये गेले होते. तसेच करुणा शर्माच्या बहिणीने (Karuna Sharma sister) केलेल्या छळाच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मानसिक तणाव आला होता. त्यामुळं त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, मुंडे यांची प्रकृती ((Dhananjay Munde Health) खालावली होती. त्यामुळं त्यांना 13 एप्रिल रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy hospital) दाखल करण्यात आले होते. शनिवारी रेणू शर्मा (Renu Sharma) हिच्यावर खंडणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    रेणू शर्माला सतत मुंडेंना ब्लॅकमेलिंग करत असे. त्यामुळं मुंडे तणावाखाली असत. शर्मा पैसाची मागणी करत असे, त्यामुळं मुंडेंना तणाव येई. क्राईम ब्रँचने 20 एप्रिल रोजी रेणू शर्माला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली. तिच्यावर धनंजय मुंडेंकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये बँकेच्या ओशिवरा शाखेत उघडलेल्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली होती. असं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.