13 वर्षीय मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून; हत्या करून मृतदेह टाकला ऊसाच्या फडात

कोरेगाव (जि.सातारा) तालुक्यातील भाडळे खोर्‍यातील हिवरे गावातील विक्रम विजय खताळ (वय 13) या शाळकरी मुलाचा धारधार शस्त्राने खून करून मृतदेह ऊसाच्या फडात टाकून दिल्याची खळबळजनक घटना घडली.

    कोरेगाव : कोरेगाव (जि.सातारा) तालुक्यातील भाडळे खोर्‍यातील हिवरे गावातील विक्रम विजय खताळ (वय 13) या शाळकरी मुलाचा धारधार शस्त्राने खून करून मृतदेह ऊसाच्या फडात टाकून दिल्याची खळबळजनक घटना घडली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याची शक्यता असून, रात्री उशिरा उघडकीस आला.

    या खुनाची माहिती समजताच हिवरे गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी रात्रीच धाव घेतली. वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि खुनाचा तपास सुरू केला. या खून प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे. खुनाचे नेमके कारण समजून आले नाही.

    या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले करीत आहेत.