Crime
Crime

सातारा जिल्ह्यातील काेरेगाव तालुक्यात एका युवतीचा तिच्या दाेन मुलांसह खून झाल्याची घटना घडली. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे योगिता (वय 38) या युवतीचा दत्ता नामदास (वय 30) याने अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

    सातारा : सातारा जिल्ह्यातील काेरेगाव तालुक्यात एका युवतीचा तिच्या दाेन मुलांसह खून झाल्याची घटना घडली. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे योगिता (वय 38) या युवतीचा दत्ता नामदास (वय 30) याने अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून केल्याची माहिती पाेलीसांनी दिली. तसेच नामदास याने तिच्या दाेन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. या घटनेतील एका मुलाचा मृतदेह पाेलिसांच्या हाती लागला आहे.

    रहिमतपूरचे पाेलीस उपनिरिक्षक प्रमाेद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काेरेगाव तालुक्यातील राजेंद्र भिकू गायकवाड यांच्या घरात भाड्याने राहण्यास असणाऱ्या दत्ता नामदास याच्या समवेत याेगिता राहत हाेती. तिचा घातपात झाल्याचा संशय घटनास्थळी गेलेल्या पाेलिसांना आला. त्यामुळे पाेलिसांनी दत्ता नामदास याच्याबाबत परिसरात चाैकशी केली. त्यावेळी ताे गावात दिसला नसल्याची माहिती समाेर आली. ताे मूळचा राजेबाेरगाव येथे असल्याचे पाेलिसांना समजले. याेगिता ही नामदास याच्यासाेबत राहत हाेती. नामदास याने याेगिता हिच्या दोन मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची माहिती समाेर आली आहे.

    चाैकशीअंती नामदास हा तिची बहिण ज्याेती अहिवळे यांच्या घरी असल्याचा संशय पाेलिसांना आला. त्यानुसार पाेलीस पथकाने अकलूज पाेलीस ठाणे येथे संपर्क साधत श्रीपुरबाेरगावंचे पाेलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून नामदास याच्याबाबत चाैकशी करण्यास सांगितले. या प्रकरणात श्रीपुरबाेरगावंचे पाेलीस पाटलांनी नामदास यास ताब्यात घेऊन अकलूज पाेलिसांच्या स्वाधीन केले.

    रहिमतपूर पाेलीसांना दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजेबोरगाव जि. उस्मानाबाद, सध्या रा. वेलंग शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) याने दिलेल्या माहितीनुसार, 15 जूनला याेगिता व तिची मुले समीर आणि तनू या दोघांनी रात्री जेवण केले. त्यानंतर सुमारे दहा वाजता झाेपी गेलाे. याेगिता हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिचा गळा दाबून खून केला. तसेच समीर व तनू यांना परिसरातील एका विहिरीत ढकलून दिले.

    दरम्यान, या प्रकरणी नामदास याच्यावर पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याेगिता हिचा खून केल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.