नाशिकरोड येथे विवाहित तरुणाची हत्या; जंगलात मृतदेह दिला फेकून, उग्र वास येऊ लागला अन्…

पंचक गावातील युवकाची निर्घृण हत्या (Murder of Youth) करण्यात आली. याप्रकरणी काही संशयित ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली असता प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी महिती पोलिसांना मिळाली आहे.

    नाशिकरोड : पंचक गावातील युवकाची निर्घृण हत्या (Murder of Youth) करण्यात आली. याप्रकरणी काही संशयित ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली असता प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी महिती पोलिसांना मिळाली आहे. पंचक गावातील ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय ३०) हा युवक ३ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास मित्रासोबत पार्टी करण्यासाठी घरून मांसाहारी जेवण बनवून दुचाकीवर गेला. मात्र, पुन्हा घरी आला नाही.

    याबाबत पत्नी, वडील व शेजारी यांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याचा तपास सुरू करण्यात आला. सोमवारी दुपारी पंचक गावातील सोमनाथ बोराडे हे आपल्या गायी-म्हशी घेऊन पंचक येथील मलनिसारणासाठी गोदावरी नदी किनारी जंगल भागात गेले. त्यांना उग्र वास येऊ लागल्याने गावकऱ्यांच्या मदतीने नाशिकरोड पोलिसांना कळवण्यात आले.

    कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

    पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या छातीवर खोलवर जखमा दिसून आले. चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले. मृतदेह ७ ते ८ दिवसांपासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी काही संशयितांना तपासासाठी आणले आहे.