
मुलीची छेडछाड केली म्हणून जाब विचारणाऱ्या आईचीची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बीड : बीडच्या अंबाजोगाई मधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीची छेडछाड केली म्हणून जाब विचारणाऱ्या आईचीची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आणि परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथील एक कुटुंब आठ दिवसापूर्वी बालाजी देव दर्शनाला गेले असता त्यांच्या तीन मुली काळवटी तांडा येथे वास्तव्यास होत्या. याच तांड्यावरील बबन चव्हाण याने त्यांच्या अल्पवयीन मुलीस विनाकारण भेटून छेडछाड करत त्रास दिला.
आई वडील देवदर्शनावरुन परत आल्यानंतर होत असलेला प्रकार या अल्पवयीन मुलीनी आपल्या आई वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी दोन दिवसापूर्वी बबन चव्हाण यास जाब विचारला. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरुन काल बबन चव्हाण त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण भाऊ सचिन चव्हाण यासह इतर तिघांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन भांडण करण्यास सुरुवात केली. अधिक मारहाण होऊ नये म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्याला खोलीमध्ये कोंडून दरवाजा लावून घेतला. त्यावेळी आरोपींनी दुसऱ्या रुममध्ये असलेल्या मुलीच्या आईकडे मोर्चा वळवून त्यांच्या पोटात तिक्षण हत्यारांनी वार करुन आणि डोक्यात लाकडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.