पदपथावर झोपण्यावरून ज्येष्ठाचा खून, खडकीतील घटना; आरोपी अटकेत

पदपथावर झोपण्यावरून ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. मंगेश भागाजी भद्रिके (वय ७५, रा. खडकी रेल्वे स्थानकासमोर) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.

    पुणे : पदपथावर झोपण्यावरून ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. मंगेश भागाजी भद्रिके (वय ७५, रा. खडकी रेल्वे स्थानकासमोर) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (वय ५२, रा. खडकी बाजार चौपाटी) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रिके, गायकवाड खडकी बाजार परिसरात किरकोळ कामे करतात. दोघेही खडकी रेल्वे स्थानकासमोर पदपथावर राहतात. पदपथावर झोपण्याच्या जागेवरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपी गायकवाड दारु पिऊन आला. झोपेत असलेल्या भद्रिके यांच्यावर त्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या भद्रिके यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या गायकवाडला खडकी पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.